पालघर- तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर तलासरी पोलिसांनी अच्छाड चेकपोस्ट येथे कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व पिकअप टेम्पो असा एकूण १३ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर तलासरी पोलिसांची कारवाई - पालघरमध्ये ८ लाखांचा गुटखा जप्त
या कारवाईत पोलिसांनी ८ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व पिकअप टेम्पो असा एकूण १३ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिकअप मधून केली जात होती तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अच्छाड चेकपोस्ट येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी तलासरी पोलीस करत होते. क्रमांक एम.एच.०५ बीएच. ३२८५ या पिकअप टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता, पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यानंतर या टेम्पोची मधील ८ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ व ५ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण १३ लाख १५ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन जणांना अटक
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींविरोधात तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवर मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होत आहे. त्याला आळा घालण्याचा पोलीसांचा प्रयत्न आहे. मात्र तरीही ही वाहतूक होताना दिसत आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेवेळी प्रेक्षक गॅलरी कोसळून 150 पेक्षा अधिक जण जखमी
हेही वाचा -गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली सह्याद्री अतिथीगृहात गोपनीय बैठक