महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लाखोंचा गुटखा जप्‍त - अवैध गुटखा जप्त

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर तलासरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 12 लाख  15 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.

गुटखा जप्‍त
गुटखा जप्‍त

By

Published : Dec 28, 2019, 9:38 PM IST

पालघर :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. तलासरीजवळच्या अच्छाड चेकपोस्ट येथे केलेल्या कारवाईत 12 लाख 15 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्याने चोरट्या पद्धतीने जप्त केलेला गुटखा मुंबईला विक्रीसाठी नेला जात होता. अच्छाड चेकपोस्ट येथे वाहनांची नियमित तपासणी करताना पोलिसांना संशय आला. याप्रकरणी टेम्पोचा चालक शाहरूख शफिकउल्ला खान (वय 34, रा. वसई) याची चौकशी केली असता गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.

हेही वाचा - ठाण्यात मेडीकलमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

या प्रकरणी टेम्पोचा चालक शाहरूख शफिकउल्ला खान (वय 34, रा. वसई) , मालक रशिद अहमद सफिउल्ला (रा.वसई) आणि गुटखा विकत घेणार्‍या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तलासरी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details