पालघर (वाडा) - जव्हार तालुक्यातील कायरी पोस्ट दाभेरी गावातील ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंबंधी ग्रामस्थ संतोष पोटींदा यांनी आदिवासी विकास विभागा जव्हार यांच्याकडे २१ जुनला तक्रारी निवेदन दिले आहे. हे काम व्यवस्थित करावे नाहीतर अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठक्कर बाप्पा योजनेतील विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकऱ्यांचा अमरण उपोषणचा इशारा - ठक्कर बाप्पा योजना
जव्हार तालुक्यापासुन ३० कि.मी अंतरावर असलेल्या दमणच्या सीमा लगत कायरी गावाजवळ ठक्कर बाप्पा योजनेतून विहीर बांधण्यात आली. मात्र, आता या विहिरीच्या सभोवतालच्या कठड्या जवळची जागा खचली आहे.
जव्हार तालुक्यापासुन ३० कि.मी अंतरावर असलेल्या दमणच्या सीमा लगत कायरी गावाजवळ ठक्कर बाप्पा योजनेतून विहीर बांधण्यात आली. हे गाव १ हजार २८३ लोकवस्तीचे आहे. विहिरीतून पाईपलाईन काढण्यात आली आहे. मात्र, आता या विहिरीच्या सभोवतालच्या कठड्या जवळची जागा खचली आहे. खचलेली विहीर ही मोठ्या पावसात पुर्ण खचून जाईल, अशी भीती गावक-यांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत संतोष पोटींदा यांनी जव्हार पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार केली. पण या कामाकडे कोणीही फिरकले नाही, असा आरोप त्यांच्याकडून होत आहे. २०१८-१९ या वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीला 7 लाख 50 हजार रूपये खर्च करण्यात आले.पण या विहिरीचे व नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे संतोष पोटींदा आणि गावकऱ्यांनी म्हटले आहे.