पालघर : वसई विरार शहरात एकीकडे खाजगी अनधिकृत शाळांचे पीक वाढत चालले आहे. त्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे तर दुसरीकडे सरकारच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. तब्बल चार महिने, पावसाळ्यापासून ही मुले उघड्यावर झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र त्यांच्या या गैरसोयीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील मानपाडा जिल्हा परिषद शाळेतील ( Manpada Zilla Parishad School in Palghar ) हा प्रकार समोर आला आहे.
Palghar ZP School : विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी फरफट; झाडाखाली भरते शाळा
पालघर जिल्ह्यातील मानपाडा जिल्हा परिषद शाळेतील ( Manpada Zilla Parishad School in Palghar ) विद्यार्थ्यांवर झाडाखाली शिक्षण घेण्याची वेळ ( Students studying under the tree ) आली आहे. मानपाडातील या शाळेचे बांधकाम जून महिन्यात मोडकळीस आल्याने ( school construction falled ) गेल्या पावसाळ्यापासून या शाळेत शिकत असलेले 110 विद्यार्थी हे वाऱ्यावर शिक्षण घेत आहेत. या मुलांना प्रशासनाने लवकरात लवकर शाळेची सोय करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
झाडाखाली शिक्षण घ्यायची वेळ : झाडाला टांगलेले बॅनर, समोर ठेवलेला फळा, आणि मधल्या सुट्टीत गावभर फिरणारे विद्यार्थी अशी अवस्था नालासोपारा पेल्हार भागातील जिल्हा परिषदेच्या मानपाडा शाळेतील सध्या दिसत आहेत. या शाळेचे बांधकाम जून महिन्यात मोडकळीस आल्याने गेल्या पावसाळ्यापासून या शाळेत शिकत असलेले 110 विद्यार्थी हे वाऱ्यावर शिक्षण घेत आहेत.
ग्रामस्थांची मागणी : खरंतर, शिक्षण विभागाने या मुलांची छत असलेल्या पर्यायी सोय करणे गरजेचे होते मात्र ती न करता विद्यार्थ्यांना झाडाखालीच बसवून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य, झाडाचा पडणारा पाला व आता सोसाट्याच्या थंडीत या मुलांना बसावे लागत आहे. या मुलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण शाळेने दिल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्यांना झाडाखाली जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या मुलांना वाऱ्यावर शिक्षण देणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न या निम्मिताने उपस्थित केला जात आहे. या मुलांना प्रशासनाने लवकरात लवकर शाळेची सोय करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.