महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक मोटारसायकल असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा

By

Published : Sep 28, 2019, 9:03 PM IST

पालघर -राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमगड येथे अवैध बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा टाकला. या गोदामातून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या 165 बाटल्या व यापासून तयार केलेल्या भेसळयुक्त मद्याच्या 194 बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच हे गोदाम बंद करून 3 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा मारून अवैध दारू केली जप्त

हेही वाचा -यवतमाळमधील बिबी गावच्या महिलांचा दुर्गावतार; गावठी हातभट्टीवर टाकली धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व एक मोटारसायकल असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बनावट मद्य तयार करण्यात येणारे गोदाम

हेही वाचा -गडचिरोलीत महिलांकडून दारूसाठा नष्ट; साहित्याची होळी

राज्य उत्पादन शुल्क पालघर अधीक्षक विजय भुकन व उपअधीक्षक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव, काटकर, सर्वश्री राठोड, पवार, कराड यांनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

रिकाम्या बाटल्याचे काय केले जाते -

महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य भरून ते खेड्या-पाड्यात विक्री करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details