पालघर- महाराष्ट्र वीज महावितरण विभागाने प्रस्तावित केलेल्या नवीन दरवाढी विरोधात आज (दि. 27 जानेवारी) महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेमार्फत पालघर रेल्वे स्थानकाबाहेर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला पालघर मधील वीज ग्राहकांनी सुद्धा उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे.
महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात पालघर येथे स्वाक्षरी मोहीम - महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
महावितरण विभागाने प्रस्तावित केलेल्या 20.4 टक्के वीज दरवाढीविरोधात पालघर येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.
महावितरण विभागाने प्रस्तावित केलेल्या नवीन प्रस्तावात 20.4 टक्के वीज दरवाढ केली असून याचा फटका शेती पंप, वीज ग्राहक, लहान औद्योगिक वीज यांना बसणार आहे. त्यामुळे नवीन सरकारने याबाबत विचार करून ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेत नागरिकांनी सह्या केलेले पत्र महावितरण विभागाला व सरकार देणार असल्याची माहिती वीज ग्राहक संघटनेनेमार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा - शिवभोजन योजनेचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ