महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shraddha Murder Case : आफताब खून लपविण्याकरिता तिचे वापरायचा इन्स्टाग्राम, फोन बंद झाल्याने मित्रांना वाटायची काळजी

वसईच्या संस्कृती काँप्लेक्समधील राहणाऱ्या श्रद्धा वालकरचे ( Shraddha Walkar Murder Case ) वय (२७) त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला ( Aftab killed shraddha Walkar) याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती.

Delhi murder case
Delhi murder case

By

Published : Nov 15, 2022, 7:38 AM IST

Updated : Nov 15, 2022, 12:37 PM IST

पालघर: जुलैपासून मला श्रद्धाची काळजी वाटत होती कारण तिच्याकडून काहीच उत्तर आले नाही. तिचा फोनही बंद होता. तिच्या इतर मैत्रिणींकडे तिची चौकशी केल्यानंतर, मी तिच्या भावाला कळवले आणि आम्ही पोलिसांकडे गेलो, असे श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादिर ( Laxman Nadir on Shraddha Murder Case ) याने सांगितले.

श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला म्हणाला की, श्रद्धा आणि आफताब 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातीला ते आनंदाने राहत होते. त्यानंतर श्रद्धा सांगू लागली की आफताब तिला मारहाण करतो. तिला त्याला सोडायचे होते. पण तसे करता आले नाही. ते ( Rajat Shukla on Shraddha Murder case ) ) नोकरीसाठी दिल्लीला शिफ्ट झाले, असेही त्यांनी सांगितले.

आरोपीला घटनास्थळी नेण्यात येत आहे:आफताबने श्रद्धाचा फोन टाकून दिला आहे. तिचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले जात आहे जेणेकरून ते परत मिळवता येईल. तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा पोलीस शोध घेत आहेत. तिच्या जिवंत असल्याचा आभास देण्यासाठी त्याने जूनपर्यंत तिचे इन्स्टाग्राम खाते वापरल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी आफताब पूनावाला याला मेहरौली पोलीस स्टेशनच्या बाहेर आणले जात आहे. त्याला आता जंगलातील घटनास्थळी नेले जात आहे. जिथे त्याने श्रद्धाच्या शरीराच्या काही भागांची कथितपणे विल्हेवाट लावली होती.

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी :श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, की आफताबला फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या जवळ होती, माझ्याशी जास्त बोलली नाही. मी कधीच आफताबच्या संपर्कात नव्हतो. मी वसईत पहिली तक्रार दाखल केली होती.

आरोपीला फाशी देण्याची श्रद्धाच्या वडिलांची मागणी

दोघांचे होते प्रेमसंबंध -वसईच्या संस्कृती काँप्लेक्समधील राहणाऱ्या श्रद्धा वालकरचे ( Shraddha Walkar Murder Case ) वय (२७) त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला ( Aftab killed shraddha Walkar) याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते.

शरीराचे केले ३५ तुकडे -आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या ( Delhi Murder Case ) केली होती. नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकर मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही

हत्या केल्याची कबुली - माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.

Last Updated : Nov 15, 2022, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details