वसई- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. वसईतही शिवसेनेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा वसईत निषेध - Vasai
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जवानांना वीरमरण आले आहे. वसईतही शिवसेनेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
वसई पारनाका येथे सायंकाळी पाकिस्तानी झेंड्यांचे दहन करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हल्ल्यात वीरमरमरण आलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा बदला नक्कीच घेतला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली आहे.
यावेळी शिवसेनेचे निलेश तेंडोलकर, प्रथमेश राऊत, निलेश भानुशे, मनाली चौधरी, महेश पाटील, जुबेर पठाण यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.