महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाडीच्या जागी मैदान बणविणाऱ्यांना निलंबित करा, सेनेचे वसई महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन - Namit Patil

वसई येथील नैसर्गिक खाडीचा प्रवाह बदलून त्या जागी मैदान उभारणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांना निलंबित करा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे वसई-विरार महापालिकेसमोर घंटनाद आंदोलन करण्यात आले.

घंटानाद आंदोलन करताना शिवसैनिक

By

Published : Jun 25, 2019, 7:51 AM IST

पालघर- वसई येथील नैसर्गिक खाडीचा प्रवाह बदलून त्या जागी मैदान उभारणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांना निलंबित करा. या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महानगरपालिका कार्यालयासमोर सोमवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

घंटानाद आंदोलन करताना शिवसैनिक

वसई येथील कृष्ण टाऊनशिप येथे असलेल्या नैसर्गिक खाडीचा प्रवाह बदलून त्या जागी मैदान उभारण्यात आले आहे. हे मैदान कोणाच्या आश्रयाखाली बनविले गेले, याबाबत लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांना निलंबित करा. या मागणीसाठी शिवसेनेतर्फे वसई-विरार महानगरपालिका एच प्रभाग कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

खाडीच्या जागी मैदान करून या खाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. हा मार्ग बदलल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याबाबतचा अहवाल निरी आणि आयआयटीने महापालिकेला दिला आहे. तसेच २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग सुरळीत करण्यात यावा, असेही नमूद करण्याात आले.

महापालिकेतकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट खाडीत भराव टाकून मैदान तयार करण्यात आले आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, तसेच संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details