पालघर -केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा पालघरमध्ये शिवसैनिकांनी निषेध करत आंदोलन केले. शिवसैनिकांनी पालघर येथील हुतात्मा चौक येथे रावसाहेब दानवे व केंद्र सरकार विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला. दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी केली आहे.
काय होते दानवेंचे वक्तव्य-
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या आंदोलनात शेतकरी नसून दुसरेच लोक आहेत. पाकिस्तान आणि चीनकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे, असे दानवे म्हणाले होते. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्यांचा निषेध केला जात आहे.
दानवेंविरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन-