महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Zilla Parishad : पालघर जिल्हापरिषदेवर शिंदे गटाचे वर्चस्व... अध्यक्षपदी प्रकाश निकम तर उपाध्यक्षपदी पंकज कोरे यांची बिनविरोध निवड

पालघर जिल्हा परिषदेची बिनविरोध निवडणूक पार ( Unopposed Palghar Zilla Parishad Election ) पडली. अध्यक्षपदी एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश निकम तर उपाध्यक्ष पदी भाजपचे पंकज कोरे ह्यांची बिनविरोध निवड झाली.

Prakash Nikam
पालघर जिल्हापरिषदेवर शिंदे गटाचे वर्चस्व

By

Published : Nov 17, 2022, 9:41 AM IST

Updated : Nov 17, 2022, 10:01 AM IST

पालघर :पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश निकम तर उपाध्यक्ष पदी भाजपचे पंकज कोरे ह्यांची बिनविरोध निवड ( Unopposed Palghar Zilla Parishad Election ) झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ह्यासाठी ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंत भर बंदोबस्तात अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसवून ठेवण्यात आले.

नाट्यमय घडामोडींची शक्यता :पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही नाट्यमय घडामोडी घडतील अशी शक्यता वर्तविली जात होती. शेवटी शिंदे गटाकडून एक व भाजप गटाकडून एक अर्ज असे दोनच अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्ष पदी प्रकाश निकम ( Shinde group Prakash Nikam elected as President ) तर उपाध्यक्ष पदी भाजपचे पंकज कोरे ह्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर यांनी जाहीर केले.

महविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न : जिल्हा परिषदेत असलेल्या ५७ सदस्य पैकी ठाकरे गटाचे ९ सदस्य शिंदे गटाला मिळाल्याने त्यांचे २० सदस्य झाले. त्यात भाजप १३, राष्ट्रवादी १३, माकप ६, बहुजन विकास आघाडी ५ असे बलाबल होते. ह्यावेळी शिंदे, भाजप आणि मित्र पक्ष सत्तास्थापन करणार अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे महविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी,माकप,ठाकरे गट,काँग्रेस असे नवीन समीकरण बनवून सत्तास्थापन करण्याच्या हालचालींना ठाकरे गटातील आठ सदस्यांना शिंदे गटाकडे वळविल्याने ब्रेक लावले गेले.

प्रकाश निकम आणि पंकज कोरे यांची निवड :बुधवारी सकाळी११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी ह्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश निकम आणि उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे पंकज कोरे ह्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल ( Pankaj Kore elected Vice President Zilla Parishad ) केले. यावेळी शिंदे गट व भाजप, बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांना अध्यक्षांच्या चेबरमध्ये आणण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ह्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत मोठा अडथळा बनलेल्या ठाकरे गटाच्या जयेंद्र दुबळा यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने आ.रवींद्र फाटक ह्यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्तत दुबळा ह्यांना अध्यक्षांच्या चेंबरमध्ये आणण्यात आले.

जयेंद्र दुबळा :मी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही,माझ्याकडे अर्ज भरण्यासाठी कोणीही सदस्य उरला नसल्याने मी तटस्थ राहत असल्याचे जयेंद्र दुबळा ह्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक - एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री रवींद्र चव्हाण,खासदार राजेंद्र गावित,आ.रवींद्र फाटक,आ.श्रीनिवास वनगा,आ.राजेश पाटील,वसंत चव्हाण,भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील,माजी अध्यक्ष वैदेही वाढाण,नगराध्यक्ष भरत राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

Last Updated : Nov 17, 2022, 10:01 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details