पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच थांबावे. संचारबंदीत जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे. 'रूट मार्च' काढत पोलिसांनी शहराच्या मुख्य भागातून संचलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा 'रूट मार्च'
पालघर शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी 'रूट मार्च' काढून जनजागृती केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा 'रूट मार्च'
नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, तसे केल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता पालघर, बोईसरसह जिल्ह्यातील इतर बड्या शहरांमध्ये अनावश्यकपणे फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना चाप बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.