महाराष्ट्र

maharashtra

पालघर शहरात एकाच रात्री तीन दुकानांवर चोरांचा डल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By

Published : Jun 15, 2019, 2:00 PM IST

लोकमान्य नगर परिसरातील एकाच रात्री एजी फार्मा मेडिकल स्टोअर, पायोनियर हार्डवेअर स्टोअर, जय रामदेव किराणा  या दुकानांत आणि विधीतज्ञ तरडे यांच्या कार्यालयात  रात्री दोनच्या सुमारास  झाली. मेडिकलमध्ये चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पालघर शहरात एकाच रात्री तीन दुकानांवर चोरांचा डल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पालघर -शहरातील लोकमान्य नगर परिसारात एकाच रात्री तीन दुकानांमध्ये आणि विधितज्ञांच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना चोरी झालेल्याच एका मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


लोकमान्य नगर परिसरातील एकाच रात्री एजी फार्मा मेडिकल स्टोअर, पायोनियर हार्डवेअर स्टोअर, जय रामदेव किराणा या दुकानांत आणि विधीतज्ञ तरडे यांच्या कार्यालयात रात्री दोनच्या सुमारास झाली. मेडिकलमध्ये चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये एकूण सहा चोर असल्याचे निदर्शनास आले. तीन दुकाने मिळून सुमारे 12 हजारांची रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले आहेत. विधी तज्ञ यांच्याकडील काहीही चोरीला गेले नसल्याचे समजते. याप्रकरणी पालघर पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details