पालघर- सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात 8 लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शैक्षणिक संकुलात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट जॉन तांत्रिक शैक्षणिक संकुलात शाळा, इंजीनियरिंग, डिग्री कॉलेज, फार्मसी कॉलेजच्या इमारती आहेत. शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शुल्क, सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच इंडस्ट्रियल व्हिझीटचे पैसे कार्यालयाच्या कपाटात होते.