महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंभई गावातील रस्ता पाण्याखाली, विद्यार्थ्यांनी काढली पुराच्या पाण्यातून वाट - पालघर जिल्ह्यातील अंभग गावात पूर

पालघर जिल्ह्यात संततधार सुरू आहे. यात 17 सप्टेंबरला पावसाने जोर धरला असून वाडा-मनोर महामार्गावरील वाडा तालुक्यातील अंभई गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. या गावात जिल्हापरिषद शाळेसह, विद्यालय आणि कॉलेज आहे.

पुराच्या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थी

By

Published : Sep 19, 2019, 9:23 AM IST

पालघर - अंभई गावात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शाळकरी मुलांना शिक्षक आणि पालकांच्या मदतीने रस्ता ओलांडून जावे लागत होते. 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबरला पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघर जिल्ह्यात संततधार सुरू आहे. यात 17 सप्टेंबरला पावसाने जोर धरला असून वाडा-मनोर महामार्गावरील वाडा तालुक्यातील अंभई गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. या गावात जिल्हापरिषद शाळेसह, विद्यालय आणि कॉलेज आहे.

पुराच्या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थी

पावसामुळे जवळील डोंगर उतारावरील पाणी सरळ गावातील शेतीमध्ये साचते आणि येथुनच गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शाळेतील विद्यार्थींवर्गाची तारांबळ उडाली होती. या रस्त्यावर अचानकपणे पाणी वाढले आसून अत्यंत वेगाणे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थीं, शिक्षक आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडु नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details