पालघर (वाडा) -जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसत आहे. आज (८ जुलै) दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाडा- भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील कोकाकोला रस्त्यावर दोन ते तीन फुट खोल खड्डे पाण्याने भरले आहेत. यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना त्रास होत आहे.
वाडा -भिवंडी महामार्गावर पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी
आज (८ जुलै) दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाडा- भिवंडी महामार्गावरील कुडूस येथील कोकाकोला रस्त्यावर दोन ते तीन फुट खोल खड्डे पाण्याने भरले आहेत.
वाडा -भिवंडी महामार्गावर पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, दुरुस्तीची मागणी
वाड्यातील स्थानिक पत्रकार असलेले मच्छिंद्र पष्टे यांनी या ठिकाणी दगडगोटे टाकुन रस्त्यावरील वाहनांना दिशादर्शकाचे काम केले आहेत. तसेच, रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावे, अशी मागणी केली आहे.