महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Crime : पालघर साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली; पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे दोन्ही साधू सुखरूप - पालघर येथील साधूंना पोलीस मित्राने वाचवले

जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे दोन वर्षांपूर्वी गैरसमजातून दोन साधू व एका वाहन चालकाची हत्या करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती डहाणू तालुक्यात होण्याच्या आधीच पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे.

Palghar Crime
Palghar Crime

By

Published : Apr 4, 2023, 4:28 PM IST

Updated : Apr 4, 2023, 5:14 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पालघर :पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर येथे दोन साधू मुलं पळवायला आले आहेत अशी अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर नाथजोशी समाजाच्या दोन साधूंवर हल्ला होण्याच्या आधीच गावातील पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे त्यांनी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अनुचित प्रकार टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दिनांक 2 एप्रिल)रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास येथील नाथजोगी समाजाचे बापूनाथ सटबाजी शेगर हे नाथनगर आणि प्रेमनाथ सटबाजी शेगर हे दोघं भिक्षा मागण्यासाठी डहाणू तालुक्यातील वणई चंद्रनगर मार्गे शिवोन या गावी जात असताना वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनई चंद्रनगर या गावात त्यांच्याबद्दल लोकांमध्ये मूल पळवणारी टोळी आली असा गैरसमज झाला. त्यानंतर गावातील लोकांनी त्यांना घेरले असता गावातील पोलीस मित्र हरेश्वर सुरेश घुटे यांनी या साधूंना गावातील एका दुकानात नेऊन बसवले व जमावाला शांत करत लागलीच वाणगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणात मुल पळवणारी टोळी असे काही नाही हे स्पष्ट झाले.

सध्या हे साधू गुजरात राज्यातील भिलाड येथे राहतात : डहाणू तालुक्यातील वानगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतर वानगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महाले पोलीस नाईक गायकवाड, पोलीस शिपाई गोटरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंत आक्रमक झालेल्या समाज बांधवांना समजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या साधूंना वाणगाव पोलीस स्टेशनला आणले व पोलिसांनी खात्री केली असता सदर साधू हे नाथजोगी समाजाचे असून, ते पूर्णवळ भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे आधार कार्ड असल्याने त्यांची ओळख पटली आहे. सध्या हे साधू गुजरात राज्यातील भिलाड येथे राहत असल्याने त्यांना रेल्वेने भिलाड येथे पोलिसांनी पाठवून दिले आहे असे वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे यांनी सांगितले आहे.

केवळ गैरसमजातून अफवा फसवतात : पालघर जिल्ह्यात पोलिसांनकडून राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद अभियानामुळे प्रत्येक गावात एक पोलीस ही संकल्पना राबवण्यात येत आहे. चंद्रनगर वनई हे गाव पोलीस हवालदार सुनील भोये यांच्याकडे असल्याने त्यांना स्थानिक जागरूक ग्रामस्थ पोलीस मित्र हरेश्वर घुटे राहणार चंद्रनगर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वाणगाव पोलिसांनी त्वरित तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, मुले पळविणारी कोणतीही टोळी सक्रिय नसून, केवळ गैरसमजातून अफवा फसवतात. त्यामुळे कोणी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही व्यक्ती संशयातच वाटल्यास त्याला मारहाण न करता त्याबाबत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :Raju Shetty: आधारला पॅन लिंकसाठी पैसे म्हणजे जनतेच्या पैशावर दरोडा, राजू शेट्टी आक्रमक

Last Updated : Apr 4, 2023, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details