पालघर(वाडा) - पावसाचा तडाखा हा पालघर येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाला बसला आहे. पावसाने जिल्हात धुमाकूळ घातला असून पालघर न्यायालयात पाणी साचले आहे.
पालघरमधील न्यायालयात घुसले पावसाचे पाणी
मुंबई व उपनगरासह पालघर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येथील न्यायालयात पाणी शिरल्याने चांगली तारांबळ उडाली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरील पालघर न्यायालय आहे. या न्यायालयात पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई व उपनगराला अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज समुद्रात हायटाईडची परिस्थिती असल्याने पालघर जिल्ह्याच्या वसई, अर्नाळा, सफाळे परीसर, वाढवण, डहाणू अशा समुद्रीतटा जवळच्या गावांना हायटाईडचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तर जिल्ह्यातील नदी व बंधाऱ्यात जलसाठा वाढला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पिंजाळ, वैतरणा आणि तानसा नदीकाठी गावांना पुराचा फटका बसु शकतो.