पालघर- मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नालासोपारा परिसरात रस्त्यावर तसेच अनेक सखल भागांत पाणी तुंबले आहे. नालासोपारा चंदननाका येथील 'श्री नामितो आर्ट' गणेश मूर्ती कार्यशाळेत पावसाचे पाणी शिरल्यामुळे या कार्यशाळेचे व येथील अनेक गणेश मूर्तींचे नुकसान झाले आहे.
नालासोपाऱ्यातील गणेश कार्यशाळेत शिरले पावसाचे पाणी ; मूर्तिकाराला अश्रू अनावर - मूर्ती
पावसाचे पाणी गणपतींच्या कार्यशाळेत घुसल्याने मूर्तिकार चिंतातूर झाले आहेत. तसेच आपल्या कार्यशाळेची व येथे तयार होत असलेल्या गणपतीच्या मूर्तींची दयनीय अवस्था पाहून त्यांना आपले अश्रू अनावर झाले.
नालासोपारा येथे गणेश कार्यशाळेत पावसाचे पाणी शिरले
पावसाचे पाणी गणपतींच्या कार्यशाळेत घुसल्याने मूर्तिकार चिंतातूर झाले आहेत. तसेच आपल्या कार्यशाळेची व येथे तयार होत असलेल्या गणपतीच्या मूर्तींची दयनीय अवस्था पाहून त्यांना आपले अश्रू अनावर झाले. मूर्तिकारांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीच्या आर्डर घेतलेल्या आहेत. मात्र, तयारे केलेले हे गणपती पावसाच्या पाण्यात भिजले आहेत. त्यामुळे या मुर्तीकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.