पालघर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर नागरिकांनी रेल रोको केला. यामुळे पश्चिम रेल्वेची नालासोपारा येथून होणारी अप- डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा २ तासांपासून ठप्प आहे.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा 'रेल रोको' - mumbai
नालासोपारा येथे सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केला आहे. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात रेल्वे रुळावर उतरून निदर्शने केली.
रेल रोको
दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र रोष व संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नालासोपारा येथे सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केला आहे. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात रेल्वे रुळावर उतरून निदर्शने केली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेल रोको करणाऱ्या प्रवाशांनी केली.