पालघर- पालघरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सोमटा गावानजीक अपघाती मृत्यू झाला आहे. विजय भोईर (वय 33) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पोलीस कर्मचार्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीसाचा मृत्यू
विजय भोईर या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर दिली असल्याचे कळते.
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर मागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते, या अपघातात भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डहाणू येथील आंबोली येथे राहणारे विजय भोईर सोमवारी सकाळी ड्युटीवर जात असताना ही घटना घडली. या अपघातात दुचाकीला धडक देणारा अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने कासा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.