महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस निरीक्षकाचा क्रिकेट सामन्यादरम्यान मृत्यू - पोलीस निरीक्षकाचा क्रिकेट सामन्यादरम्यान मृत्यू

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत क्रिकेटचे सामने आयाजित करण्यात आले होते. सफाळे येथील मकुणसार येथील मैदानावर या स्पर्धा चालू होत्या. एका क्रिकेटच्या सामन्यात पोलीस निरीक्षक संदीप सानप यांचा संघ विजयी झाला होता.

police-inspector-died-during-cricket-match
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप

By

Published : Jan 4, 2020, 6:16 PM IST

पालघर -सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप (वय 38) यांचा क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मकुणसर मैदानावर पालघर पोलीस ठाण्यांअंतर्गत क्रिकटचे सामने आयाजित करण्यात आले होते.

हेही वाचा - ननकाना देव दरबार गुरुद्वारा हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पाकिस्तानी दूतावाराबाहेर आंदोलन

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत क्रिकेटचे सामने आयाजित करण्यात आले होते. सफाळे येथील मकुणसार येथील मैदानावर या स्पर्धा चालू होत्या. एका क्रिकेटच्या सामन्यात पोलीस निरीक्षक संदीप सानप यांचा संघ विजयी झाला. मात्र, विजयी जल्लोष साजरा करताना सानप यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना उपचारासाठी वसई येथे प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सानप हे मूळचे नाशिक येथील रहिवासी असून, गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - मध्यपूर्वेतील तणावाने पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच

ABOUT THE AUTHOR

...view details