पालघर - जिल्ह्यातील वसई, वालीव, माणिकपूर, नालासोपारा, पालघर आशा वेगवेगळ्या ठिकाणी बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर येणाऱ्या व्यक्तींना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या वलीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आवळल्या. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून रतन नारायण गुंजाळ (वय ४६), सुनील नारायण गुंजाळ (वय ३५) आणि कोटेश शामल गायकवाड (वय ४६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बँकेतून रक्कम काढणाऱ्या व्यक्तींना लुटणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या टोळीने आत्तापर्यंत १२ गुन्हे केल्याचे उघड झाले असून त्यांच्याकडून सोने-चांदी असा एकूण ४ लाख ३६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याात आला आहे. कोटेश गायकवाड हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर ६ ते ७ गुन्हे दाखल असून जेलमध्येही शिक्षा भोगलेली असल्याचे कळते.
पालघर जिल्ह्यातील वसई, वालीव, माणिकपूर, नालासोपारा, पालघर आशा वेगवेगळ्या ठिकाणी बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेऊन ही टोळी त्यांचा पाठलाग करीत असे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोटार सायकलच्या डिक्कीमधून, कारची काच फोडून तसेच कारचे ऑईल लिकेज असे सांगून अनेक लोकांचे पैसे लुटणाऱ्या टोळीला वालीव पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने आत्तापर्यंत १२ गुन्हे केल्याचे उघड झाले असून त्यांच्याकडून सोने-चांदी असा एकूण ४ लाख ३६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याात आला आहे. कोटेश गायकवाड हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर ६ ते ७ गुन्हे दाखल असून जेलमध्येही शिक्षा भोगलेली असल्याचे कळते. पोलिसांनी या टोळीकडून चोरी करण्यासाठी लागणारे हत्यारे, मोटार सायकल, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी दक्षिणेकडील असून ठाणे, नवी मुंबई, पालघर, गुजरात याठिकाणी अनेक चोऱ्या केल्याचे कळते.
प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सागर यादव, सचिन दोरकर, राजेंद्र फड, महेश जाधव, तुकाराम माने, संतोष शेंडे, बालाजी गायकवाड, सचिन बळीद आणि भीमगौंडा व्हसकोटी या टीमने ही टोळी जेरबंद केली आहे.