पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बसमधील आसन क्षमतेच्या 50% प्रवासी बसवणे हा कडक निर्बंध लावण्यात आलेला आहे. मात्र शिरूर तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसी असलेल्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात कामगारांची ने-आण करण्यासाठी काही बस चालकांविरोधात करवाई करत एकूण ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर पोलिसांची कारवाई - रांजणगाव एमआयडीसी
रांजणगाव एमआयडीसीमधील कामगारांची ने आण करणाऱ्याकरिता आसन क्षमतेच्या 50% प्रवासी बसवणे गरजेचे आहे. अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर रांजणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी बसचालकांविरोधात प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यात ३ बसचालकांवर कारवाई करण्यात आली.
रांजणगाव एमआयडीसीमधील कामगारांची ने-आण करणाऱ्याकरिता आसन क्षमतेच्या 50% प्रवासी बसवणे गरजेचे आहे. अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर रांजणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी बसचालकांविरोधात प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यात ३ बसचालकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार आबासाहेब नाईक, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्व चालक-मालक यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.