महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे... बोलाची कढी आणि बोलाचाच भात... - plastic ban

पर्यावरणाच्या ऱहासात  प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या गटारात प्लास्टिक ही वस्तू दिसतेच. या प्लास्टिकचा फटका नाले तुंबून काही ठिकाणी जलमय परिस्थिती नागरिकांनी अनुभव देखील आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे... बोलाची कढी आणि बोलाचाच भात...

By

Published : Jul 5, 2019, 2:47 AM IST

पालघर (वाडा) - प्लास्टिक बंदीला वर्ष उलटले तरी आज प्लास्टिक बंदीला हारताळ फासला गेला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचा ग्रामीण भागात व शहरीभागात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दिसून येत आहे. राज्य सरकारने प्लास्टिक पिशवी बंदी आणली व पुढे पर्यावरण मंञी रामदास कदमांनी तर दुधाची प्लास्टिक पिशवी परत केली तर 50 पैसे देण्यात येतील अस वक्तव्यही दरम्यानच्या काळात केले होते.

ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे... बोलाची कढी आणि बोलाचाच भात.......

पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या गटारात प्लास्टिक ही वस्तू दिसतेच. या प्लास्टिकचा फटका नाले तुंबून काही ठिकाणी जलमय परिस्थिती नागरिकांनी अनुभव देखील आहे. ना स्थानिक स्वराज्य संस्था याला अटकाव करू शकली, ना नागरीक किंवा ग्रामस्थात याबाबत जागरूकता दिसून आली.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात 84 ग्रामपंचायती येतात. तर एक वाडा नगरपंचायत आहे. वाडा ग्रामपंचायतीची नव्याने नगरपंचायत तयार झाली. या नगरपंचायतीचा काही महिने प्रशासकाकडे पदभार असताना प्लास्टिक बंदीवर कारवाई झाली. मात्र, नंतर या प्लास्टिक बंदीवर कोणतीच कारवाई करण्यात आली की नाही याची आकडेवारी आणि माहीती देण्यास चालढकल नगरपंचायतकडून केली जातेय. मुख्य कार्यकारी अधिकारीही नगरपंचायतीच्या अधिकारीवर्गाकडे बोट दाखवतात, तर अधिकारीवर्ग चालढकल करतात.

घनकचऱयाला क्षेपणभुमी नाही, म्हणून जागा शोधण्याकरता मुख्यकार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यातील वाद प्रसिद्धीमाध्यमात चांगलाच चर्चेत आला होता. आज वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत प्लास्टिकचा वावर दिसतोय. त्याच ठिकाणी मोकाट कुञ्यांचा वावरही दिसतोय. वाडा - भिवंडी महामार्गावरील पुर्वी कचरा टाकत असलेल्या ठिकाणी व परीसर ही प्लास्टिक पिशव्या दिसतात. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत ही अंमलबजावणी दिसुन येत नाही. कचरा झाला की अस्ताव्यस्त सर्वञ पसरलेला दिसतो. नाहीतर गावाच्या वेशीवर तो टाकला जातो यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आढळते.

यावर वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी प्लास्टिक बंदीवर किती कारवाई ही त्या ग्रामपंचायतीकडे असते. घनकचरा व्यवस्थापनाबाबत (shorting ) त्यांनी बोलताना ग्रामपंचायत स्तरावर ओला कचरा सुका कचरा आणि इतर कचरा व्यवस्थापन अजुन तरी तालुक्यात दिसत नाही. पण प्रयत्नशील आहोत. असंही कचरा व्यवस्थापनाबाबत माहीती यावेळी दिली. एकंदरीत ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी ही बोलाची कढी आणि बोलाचाच भात... अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details