महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सूर्या धरणाच्या जुन्या पाईपलाईनला गळती; हजारो लीटर पाणी वाया - Khanivade Toll Naka

शनिवारी सकाळच्या सुमारास खानिवडे टोल नाका परिसरात या पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी साधारण: 10 ते 12 तास लागणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तोपर्यंत जून्या पाईप लाईनचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

By

Published : Jun 5, 2021, 3:38 PM IST

पालघर - वसई-विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनला खानिवडे टोल नाका परिसरात शनिवारी मोठी गळती सुरू झाली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. सूर्या धरणातून वसई विरार पालिकेला पाणीपुरवठा होतो.

सूर्या धरणाच्या जुन्या पाईपलाईनला गळती

सूर्या धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी धरणातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास खानिवडे टोल नाका परिसरात या पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी साधारण: 10 ते 12 तास लागणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे तोपर्यंत जून्या पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नवीन पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. मात्र हा पुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details