पालघर - वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ पसरली आहे. यामुळे आतापर्यंत ५० हून अधिक जण तापाणे फणफणले आहेत. या गावात काही रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणेही आढळून आल्याने त्यांच्यावर वाडा शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ; ५० हून अधिक जण फणफणले
वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ आली आहे. ५० हुन अधिक जणांना तापाची लागण झाली आहे. १३ रुग्ण भरती असून त्यांच्या मध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर वाडा ग्रामीण रुग्णालयात १३ जणांना भरती करण्यात आले आहे.यांच्यात डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णांच्या तपासणी अहवालात डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यामुळे काही रुग्णांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. सद्या वाडा ग्रामीण शासकीय रुग्णालयात १३ रुगणांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न डॉक्टरांकडून केले जात आहेत.