महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस हुतात्मा स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस दलाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

पोलीस हुतात्मा स्मृती दिन
पोलीस हुतात्मा स्मृती दिन

By

Published : Oct 21, 2020, 8:24 PM IST

पालघर -21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 1 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2020 कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडलेल्या देशभरातील 261 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, शैलेश काळे, पोलीस उपाध्यक्ष गृह यांनी वाचन करून पोलीस दलाकडून रायफलच्या तीन वेळा फैरी झाडून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते. जिल्ह्याच्या मुख्यालयात या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details