महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाच्या उसंतीने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग; पावशा म्हणाला पेरते व्हा..पेरते व्हा..

पावसाच्या उसंतीने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. शेतकरी काम करत असताना पावशा पक्षी पेरते व्हा. . . पेरते व्हा असा संदेश देत आहे.

पेरणीची कामे करताना शेतकरी

By

Published : Jul 3, 2019, 11:55 PM IST

Updated : Jul 4, 2019, 12:41 AM IST

पालघर (वाडा)- पावसाने पाचव्या दिवशी उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या शेतींच्या कामांची लगबग सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पावशा पक्षानेही पेरते व्हा. . .पेरते व्हा . . असा संदेश दिला असून शेतशिवारात पावशाचा किलबिलाट सुरू आहे.

पावशाचा संदेश पेरते व्हा. . . .पेरते व्हा


मुसळधार पावसामुळे शेतजमीनीच्या बांधबस्तीची पुराने नासधूस केली. पेरलेले भात पीक पाण्याखाली गेले होते. आज पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र शेतकरी बैलजोडीसह काही ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. यात जंगलातील पावशा पक्षीही बळीराजाला उसंतीच्या वेळी "पेरते व्हा...पेरते व्हा, असा संदेश देत होता.


वाडा तालुक्यात संततधार पावसाने भातशेती पाण्याखाली गेली होती. पुराच्या पावसाने शेतजमीनीची बांधबंधस्ती वाहून नेली होती. पुराने येणाऱ्या गाळाने पेरलेले बियाणे गाडले गेले होते. कुणाची पेरणीच झाली नव्हती. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी पावसाअभावी भात बियाणे पेरले होते. मोटार पंपाच्या साहाय्याने पाणी देवून ते जगविण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पावसात तो प्रयोग सफल झाल्याने शेतकरी शेतात नांगरणी करून ते लागवडीच्या प्रयत्नात आहेत.
सकाळपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकरी शेती कामास लागला आहे. यातच शेतकऱ्यांना पेरणीसाठी सुचित करणारा पावशा पक्षी ओरडून पेरते व्हा ... पेरते व्हा ... असा संदेश देत आहे.

Last Updated : Jul 4, 2019, 12:41 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details