पालघर (वाडा)- रुग्णाच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे. तसेच त्याला इतरत्र दाखल करतांना रुग्णवाहिके बरोबर परिचारिका न पाठविण्यात आल्याने वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या उपचारपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाडा तालुक्याच्या सीमेवरील विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावातील अशोक बाळू पाटील (४६) यांचा नांगरणी करताना छोट्या टॅक्टरमध्ये पाय फसला. पाय अडकल्याने त्यांना १४ जुन रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचाराठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविले होते. पुढील उपचाराठी सदर रूग्णाला नेत असताना रुग्णवाहिके बरोबर परिचारिका पाठविण्यात आली नाही. त्यामूळे रुग्नाकडे दुर्लक्ष केले जात असून वाडा ग्रामीण रुग्णालयाद्वारे उपचारपद्धतीत हलगर्जीपणा होत असल्याच्या आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयाद्वारे उपचारपद्धतीत हलगर्जीपणा होत असल्याच्या व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिके बरोबर परीचारिका नसल्याचा, त्याचबरोबर रुग्णवाहिकेत आवश्यक त्या सुविधा नस्लाचे या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे.
वाडा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणाबद्दल सांगतांना संतप्त नागरिक
याबाबत वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी अशोक बाळू पाटील (४६) यांचा उपचार केला असून त्यांना रूग्णवाहीकेत पुढील उपचाराठी ठाणे येथे पाठविण्यास आले असल्याचे सांगितले. आणि रूग्णाबरोबर परिचारिका पाठविण्यात येत नसते. असे त्यांनी ईटिव्ही भारताशी बोलतांना सांगितले.
वाडा ग्रामीण रूग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे विक्रमगड, भिवंडी, पालघर, जव्हार आणि मोखाडा सीमा हद्दीतील बाह्य़रुग्ण उपचारासाठी येत असतात. भिवंडी-वाडा -मनोर या रसत्यावर अपघात झाल्यास अपघातग्रसतांना उपचारार्थ खाजगी हॉस्पिटल व्यतिरिक्त कुठलेही सुसज्ज असे ट्रॉमाकेअर सेंटर नाही. त्यामुळे रूग्णांना अपघातातील मोठ्या उपचाराठी ठाणे - भिवंडी - मुंबई या ठिकाणच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येते.
सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची सोय आहे. रूग्णालयात सुसज्ज आरोग्य सुविधा नसल्याने रूग्णांना येथे दाखल होऊन पुढील उपचारासाठी दुसऱया दवाखाण्यात हालविले जाते. यामुळे रुग्णांची हेळसांड होते. येथे वैधकीय कर्मचाऱयांची रिक्तपदे आहेत. या रुग्णालयाची बेड संख्या वाढवून याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा व वाडा येथील आरोग्य यंत्रणा सोयी सुविधेने सुसज्ज करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.