महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साग लाकडाची अवैद्य वाहतूक करणाऱ्या ३ जणांना अटक; २० लाखांचा मुद्देमाल जप्त - teak wood

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यानजीक ट्रकमधून अवैद्यरित्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस पथकासोबत आरोपी

By

Published : Feb 19, 2019, 9:13 PM IST

पालघर- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यानजीक ट्रकमधून अवैद्यरित्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यानजीक मंगळवारी पोलीस अधीक्षक पालघर यांचे पथक गस्त घालत होते. रात्री २ वाजताच्या सुमारास एक संशयित ट्रकची तपासणी केली. या ट्रकमध्ये पोलिसांना सागाची लाकडे आढळून आली. शासनाची कोणतीही परवानगी नसताना या सागाच्या लाकडांची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी ट्रक चालकासह २ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल कासा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details