पालघर (वाडा) - पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी बाजी मारली. त्यांनी महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा 88 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या निवडणुकीत राजेंद्र गावित आणि बळीराम जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली असली तरी एकूण या मतदारसंघात 12 उमेदवार उभे असतानाही तिसऱ्या क्रमांकावर 'नोटा'ला मतदान केले गेले.
अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित 88 हजार 883 च्या माताधिक्याने विजयी झाले. गावित यांना 5 लाख 80 हजार 479 मते, तर महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 596 इतकी मते मिळाली. 29 हजार 479 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.
गावितांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना देऊन वरिष्ठ नेतृत्वाचे यावेळी आभार मानले. त्याचप्रमाणे मतदारसंघातील पाणी, वाहतूक, मच्छिमारांच्या आणि कुपोषणाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेंद्र गावित व महाआघाडीच्या बविआचे बळीराम जाधव यांच्यात प्रमुख लढत राहिली. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली गेली. या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपकडून तिकीट मिळवत बविआचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि बविआ एकमेकांच्या विरोधात लढली होती. या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावितांनी 2 लाख 72 हजार 782 मते मिळवत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा 29 हजार 572 मतांनी पराभव केला. तर काँग्रेससारख्या प्रमुख पक्षाला या संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात फक्त 50 हजाराच्या आत मते मिळाली होती.
कोणाला किती मते
राजेंद्र गावितांनी -
5 लाख 9 हजार 989
बविआचे बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 391
तर नोटाला 29 हजार 463 मते दिली गेली
भाजपकडून तिकीट मिळवत राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारली होती. पण, कालावधी कमी मिळाला आणि पुन्हा या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाजी मारली आहे.
राजेंद्र गावित विजयानंतर बोलताना वसई भागातील वाहतूक, गटार, पाणी या मुद्यासह लोकसभा मतदारसंघातील कुपोषण, स्थलांतर, रेल्वे, नागरीकरण, मच्छिमारांचे व इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
LIVE update-
- शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी
- राजेंद्र गावित यांचा विजय निश्चित असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष
- 3.15 - शिवसेनेचे राजेंद्र गावित 87,218 मतांनी आघाडीवर राजेंद्र गावित (शिवसेना) 572332, बळीराम जाधव (बविआ) 485114, नोटा 29244, नोटाला 3 नंबरची मते
- 2.25 - शिवसेनेच्या गावितांचा विजय जवळपास निश्चित, ९० हजाराहून अधिक आघाडी
- 1.39 - पालघर लोकसभा मतदारसंघात नोटा मतांची संख्या 25 हजारांच्या वर....
- 1.30 - राजेंद्र गावित यांची निर्णायक आघाडी
- 1.20 - राजेंद्र गावित (शिवसेना )448556, बळीराम जाधव (बविआ)371052, नोटा 24611
- 12.45 - राजेंद्र गावित (शिवसेना )395567, बळीराम जाधव (बविआ)329005, नोटा 21807... राजेंद्र गावित 66562 मतांनी आघाडीवर
- 12.20 - राजेंद्र गावित (शिवसेना )305404, बळीराम जाधव (बविआ)265754, नोटा 17808... राजेंद्र गावित 41277 मतांनी आघाडीवर
- 11.56 - राजेंद्र गावित (शिवसेना ) 250225, बळीराम जाधव (बविआ) 222994, नोटा 15172, राजेंद्र गावित 27231 मतांनी आघाडीवर
- 11.46 - शिवसेनेचे राजेंद्र गावित सातत्याने आघाडीवर, 22089 मतांची आघाडी... राजेंद्र गावित (शिवसेना ) 245887, बळीराम जाधव (बविआ) 218881, नोटा 15033
- 11.30 - राजेंद्र गावित (शिवसेना) 206566, बळीराम जाधव (बविआ) 193535, नोटा 13163.. राजेंद्र गावित 13031 मतांनी आघाडीवर
- 11.15 - राजेंद्र गावित (शिवसेना ) 175093, बळीराम जाधव (बविआ)160455, नोटा 11178
- 10.55 - राजेंद्र गावित (शिवसेना ) 155249, बळीराम जाधव (बविआ)139178, नोटा 9579
- 10.40 - शिवसेनेचे राजेंद्र गावित १३२९८ मतांनी आघाडीवर, राजेंद्र गावित (शिवसेना 143017, बळीराम जाधव (बविआ)129719, नोटा 9073
- 10.25 - राजेंद्र गावित (शिवसेना)138719, बळीराम जाधव (बविआ)119511, नोटा 8557
- 10.15 - शिवसेनेचे राजेंद्र गावित 5234 मतांनी आघाडीवर.. राजेंद्र गावित (शिवसेना 94473, बळीराम जाधव (बविआ) 89239, नोटा 6341
- 10.05 - नोटाला तीन नंबरची मते, शिवसेनेचे राजेंद्र गावित 3022 मतांनी आघाडीवर.. राजेंद्र गावित (शिवसेना)77786, बळीराम जाधव (बविआ)74764, नोटा 5270
- 9.58 - बविआचे बळीराम जाधव 1547 मतांनी आघाडीवर.. राजेंद्र गावित (शिवसेना)65672, बळीराम जाधव (बविआ)67219
- 9.40 - राजेंद्र गावित (शिवसेना) 47808, बळीराम जाधव (बविआ) 43599, नोटा -3193
- 9.30 - शिवसेनेचे राजेंद्र गावित 1605 ने आघाडी.. राजेंद्र गावित (शिवसेना) 36802, बळीराम जाधव (बविआ) 35197
- 9.20 - राजेंद्र गावित (शिवसेना)_22405, बळीराम जाधव( बविआ)_25895, बळीराम जाधव 3490 मतांनी आघाडीवर
- 9.10 - बविआचे बळीराम जाधव आघाडीवर 3130
- 9.05 - पोस्टल मतदान : राजेंद्र गावित 543 मतांनी आघाडीवर
- 8.07- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली गोपनियतेची शपथ
- 8.05 - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
- 7.30 - पालघर लोकसभा मतदारसंघात सूर्या कॉलनी गोदाम क्रमांक दोन येथे थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 35 फेऱ्यांमधूनही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी 14 टेबल आहेत. या मतमोजणी प्रक्रियासाठी जवळपास सोळाशे अधिकारी कर्मचारी तैनात असून पालघर लोकसभा मतदारसंघात विक्रमगड, पालघर, डहाणू, बोईसर नालासोपारा, वसई यावंसहा विधानसभा क्षेत्रांमधील 18 लाख 85 हजार 297 मतदार असून त्यांपैकी 12 लाख1298 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
- 7.00 - पालघर लोकसभेच्या जागेसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात असून महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विरुद्ध शिवसेना महायुतीचे राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत पाहावयास मिळणार आहे.
.
पालघर - पालघरच्या जनतेचा कौल कुणाला मिळणार? कोण होणार पालघरचा नवा खासदार याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २०१८ च्या पोटनिवडणुकीनंतर येथील जनता एका वर्षानंतर लगेचच निवडणुकीला सामोरे गेली आहे. येथे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडी पुरुस्कृत महाआघाडीचे बळीराम जाधव यांच्यात खरी लढत होत आहे. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात असल्याने निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पालघर मतदारसंघात यावेळी ६३.७२ टक्के मतदान झाले. २०१४ पेक्षा यावेळी जवळपास दोन टक्के जास्त मतदान झाले. २०१४ ला ६२.९१ टक्के मतदान झाले होते.
2018 ची पोटनिवडणूक
2014 साली येथून भाजपचे चिंतामण वनगा हे निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. वनगांचे 30 जानेवारी 2018 रोजी निधन झाले होते. मात्र, त्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत पालघरमधील राजकारण तापले. भाजपकडून वनगा कुटुंबाला डावलत जात असल्याचा आरोप करत वनगा कुटुंबीयांनी थेट मातोश्रीचे दार ठोठावले. श्रीनिवास वनगांनी आपल्या हाती शिबंधान बांधून घेतले. त्यामुळे त्यावेळी सेना-भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. भाजप वनगा कुटुंबावर अन्याय करत असून, शिवसेना त्यांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन देत उद्धव ठाकरेंनी चिंतामण वणगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वणगा यांना त्यावेळी पालघर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपने काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना गाठले व त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली.
शिवसेनेने पहिल्यांदाच पालघर लोकसभा निवडणूक लढवून देखील या पोटनिवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजपचे राजेंद्र गावीत यांना 2 लाख 72 हजार 780 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा हे 2 लाख 43 हजार 206 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहीले. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 2 लाख 22 हजार 837, माकपचे किरण गहला यांना 71 हजार तर काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना 47 हजार 713 मते मिळाली.
आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने पालघरची जागा सेनेला की भाजपला हा प्रश्न उभा राहिला. मात्र, पोटनिवडणुकीत भाजपचे विजयी झालेले राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला व उद्धव ठाकरे यांनी पुन्हा यु-टर्न घेत राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे शिवसेनेत पक्षप्रवेश करीत असताना त्यांच्यासोबत त्यांनी पक्ष सोडलेल्या भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण मातोश्रीवर उपस्थित होते.
पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महाआघाडीचे उमेदवार माजी खासदार बळीराम जाधव विरुद्ध महायुतीचे राजेंद्र गावित असा थेट सामना रंगणार आहे. एकेकाळी पक्षाशी एकनिष्ठ असलेले व सर्वसामान्यांची नाळ जोडलेले राजेंद्र गावित यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विविध पक्षातील स्थलांतर यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होत चालल्याचे दिसून येत आहे.
पोट निवडणुकीतील विजयी उमेदवार
राजेंद्र गावित (भाजप) 2,72782 ( विजयी)
श्रीनिवास वनगा (शिवसेना) 2,43,210 ( पराभूत )
पालघर लोकसभा पोट निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात उभे होते
पालघर जिल्हा लोकसंख्या : एकूण 2990116 (2011 जनगणनेनुसार )
एकूण तालुके : वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड
पालघर लोकसभा एकूण मतदार :- 17 लाख 24 हजार 06