महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Earthquake: पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.6 रिश्टर स्केल

Palghar Earthquake: पालघरमध्ये आज पुन्हा पहाटे 4 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला आहे. 30 किलोमीटरच्या परिसरात हा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला असून या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती.

Palghar Earthquake
Palghar Earthquake

By

Published : Nov 23, 2022, 10:21 AM IST

Updated : Nov 23, 2022, 10:39 AM IST

पालघर:पालघरमध्ये आज पुन्हा पहाटे 4 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. पालघरच्या डहाणू, तलासरी, बोर्डी कासा, उर्से असा 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात हा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला असून या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

घरांच मोठ्या प्रमाणावर नुकसान: पालघरमध्ये मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे लहान- मोठे हादरे सुरूच आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सतत बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे येथील घरांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच सतत बसणाऱ्या या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघरमध्ये याआधीही 2018 सालापासून अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

भूकंपामुळे नागरिक भयभीत: मात्र मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती. बहुतेक भूकंपाची तीव्रता कमी होती. मात्र आज पहाटे बसलेल्या या मध्यम स्वरुपाच्या धक्क्यामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील नागरिक खडबडून जागे झाले आहे. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते.

नाशिकपासून पश्चिमेला 89 किमी अंतरावर भूकंप:आज पहाटे 04:04 वाजता नाशिकपासून पश्चिमेला 89 किमी अंतरावर 3.6 रिश्टर स्केलचा ( West of Nashik earthquake ) भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ( national centre for seismology ) म्हटले आहे.

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले: काही दिवसांपुर्वीच कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. किल्लारीसह (Earthquake Killari) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून, सात मिनिटे व एकवीस सेकंदाला भूकंपाचा भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना (Mild earthquake hits Killari) बसला होता. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असून, भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे व या धक्क्याची खोली जमिनीत पाच कि.मी. अंतरावर असल्याचे लातूरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले होते. भूकंप किल्लारीसह यळवट, सिरसल, पारधेवाडी, कार्ला, कुमठा, नदीहत्तरगा, सांगवी, जेवरी, तळणी, बाणेगावसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांत जाणवला. गेल्या सहा महिन्यांपासून किल्लारीत भूकंपाचा धक्का जाणवला नाही.

नागरिकांना अजूनही आठवतो 1993 चा किल्लारीतील भूकंप :1993 चा महाप्रलयंकारी भूकंप हा 30 सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा भूकंपाचे धक्के बसले. यावर्षी सप्टेंबर महिना अपवाद फक्त किल्लारीकरांना गेला. परंतु जवळच असलेल्या निलंगा तालूक्यातील हासोरी गाव व परिसरात भुकंपाचे अनेक धक्के बसले. शनिवारी मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसताच, अनेक नागरिक घराबाहेर पडले. थंडीच्या कडाक्यातही येथील नागरिकांनी रात्र जागून काढली.

Last Updated : Nov 23, 2022, 10:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details