महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर नगरपरिषद : नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेसमोर आघाडी बरोबरच बंडखोरांचेही आव्हान - नगरपरिषद

पालघर नगरपरिषदेचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल ११ पैकी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ३ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारांपैकी ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

पालघर नगरपरिषद

By

Published : Mar 14, 2019, 5:03 PM IST

पालघर - नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष अंजली पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार श्वेता पाटील विरुद्ध शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार अंजली पाटील विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बविआ, जनता दल आघाडीच्या उमेदवार उज्वला काळे अशी तिरंगी लढत होणार आहे.

पालघर नगरपरिषद

शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांना, नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळाले नाही, याउलट काही आयात उमेदवारांना तिकीट मिळाले. त्यामुळे सेनेतील अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख रवींद्र पाठक यांनी केले होते. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांच्यासह नगरसेवक पदासाठीही डावलल्या गेलेल्या अनेक उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागात शिवसेना अधिकृत विरुद्ध शिवसेना बंडखोर पॅनल विरुद्ध आघाडी असा तिरंगी सामना पाहण्यास मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details