सासरच्या जाचाला कंटाळून बोईसर रेल्वे स्थानकात परराज्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न - samastipur
पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावर 23 वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न आहे. मोहम्मद तमन्ने असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा बिहार मधील समस्तीपुर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
पालघर- सासरच्या जाचाला कंटाळून पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावर 23 वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तो मूळचा बिहार मधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे . मोहम्मद तमन्ने असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की आज सोमवारी सकाळच्या सुमारास मोहम्मद तमन्ने याने हातात धारधार चाकु घेऊन थेट बोईसर रेल्वे स्थानकात प्रवेश केला. त्यानंतर त्याने ओव्हर ब्रिजवर रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनी जवळ उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे प्रशासनने सतर्कता दाखवित विद्युत् पुरवठा खंडित केला. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर रेल्वे प्रशासन व अग्निशमन दल यांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरविण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या 15-20मिनिटे उशीराने सुरु आहे. सासरच्या जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजते. बोईसर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून बोइसर पोलिस ठाण्यात पुढील चौकशीकरता नेण्यात आले आहे.