महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये आणखी एक कोरोनाबाधिताची नोंद; संख्या 29 वर, तिघांचा मृत्यू - वसई-विरारमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

आत्तापर्यंत पालिका क्षेत्रात 29 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पूर्वेला गुरुवारी आणखी एक 35 वर्षीय कोरोनाबाधीत तरुण आढळल्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वसई-विरारमधील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर
वसई-विरारमधील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर

By

Published : Apr 10, 2020, 8:52 AM IST

पालघर - वसई विरार शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे आता वसई- विरारमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधिताला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत पालिका क्षेत्रात 29 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पूर्वेला गुरुवारी आणखी एक 35 वर्षीय कोरोनाबाधित तरुण आढळल्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यामुळे, महापालिका हद्दीत 26 रुग्ण तर, ग्रामीण परिसरात 3 असे एकूण 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, खबरदारी म्हणून कोरोनाबाधित रूग्ण आढळलेले परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आले असून सदर परिसर निर्जंतुक करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details