महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसरमध्ये वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट; एक कामगार जखमी

आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

By

Published : Jun 12, 2019, 1:37 PM IST

सिलेंडरचा स्फोट

पालघर- बोईसर येथील चित्रालय परिसरातील यादव वडापाव सेंटर या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याने एक कामगार जखमी झाला आहे.

बोईसरमध्ये वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट; एक कामगार जखमी

यादव वडापाव या दुकानाला आग लागली होती. या आगीमुळे दुकानातील एका सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी दुकानांत तीन सिलेंडर होते. हे सिलेंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details