महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ११३ कोरोना रुग्ण; तिघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी ११३ रुग्ण वाढले. यामुळे ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार २२९ इतकी झाली असून, ६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८८८ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Palghar Corona Update
पालघर कोरोना अपडेट

By

Published : Aug 9, 2020, 11:10 AM IST

पालघर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी ११३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ११३ कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक ९७ रुग्ण हे एकट्या पालघर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर ४ कोरोना रुग्ण डहाणू तालुक्यातील, ४ मोखाडा तालुक्यातील, २ वाडा तालुक्यातील, १ विक्रमगड तालुक्यातील व ५ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. ग्रामीण भागात पालघर तालुक्यातील २ व विक्रमगड तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार २२९ इतकी झाली असून, ६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८८८ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यात शनिवारी १२८२२कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ५०३०८४ अशी झाली आहे. शनिवारी ११०८१रुग्ण बरे झाले आहेत. ३३८३६२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १४७०४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details