महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञातांचा कुटूंबावर हल्ला, महिलेचा मृत्यू तर तिघे जखमी, डहाणूतील सोनाळे येथील घटना - knife attack news palghar district

अज्ञातांना केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना डहाणू तालुक्यातील सोनाळे येथे घडली आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

spot photo
घटनास्थळावरील छायाचित्र

By

Published : May 12, 2020, 3:07 PM IST

Updated : May 12, 2020, 4:43 PM IST

पालघर - दोन अज्ञात व्यक्तीने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डहाणू तालुक्यातील सोनाळे येथे घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वैशाली वांगड (वय 36 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून तीनपैकी दोघा गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी
सोनाळे येथे राहणाऱ्या वांगड कुटुंबीयांवर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात दोन व्यक्तींनी हल्ला चढविला. विलास वांगड यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी व मुलाला मारेकऱ्यांनी चाकुने भोसकले. यास विलास यांच्या पत्नी वैशाली वांगड (वय 36 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विलास वांगड त्यांच्या दुसऱ्या पत्नी वंदना व मुलगा हे तिघे जखमी झाले आहेत. यापैकी विलास व त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे. जे.रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अज्ञात मारेकऱ्यांविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

हेही वाचा -उत्तर प्रदेशातील कामगारांना घेऊन पालघर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वे रवाना

Last Updated : May 12, 2020, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details