पालघर - जिल्ह्यातील बोईसर येथील नेवाळे गावात गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे आणि ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अवैध गांज्याची लागवड करणाऱ्या इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद (वय ८१) याला अटक केली आहे.
पालघरमध्ये गांजाची शेती करणाऱ्या वृध्दाला अटक, २०० गांजाची झाडे जप्त - crime
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्तररित्या धाड टाकून अवैध गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे व ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने असा अमलीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
पालघर तालुक्यातील बोईसर येथील नेवाळे गावात अवैधपणे गांज्याची लागवड करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीसांनी संयुक्तररित्या धाड टाकून अवैध गांज्याची लागवड केलेली जवळपास २०० झाडे व ९०५ ग्रॅम गांज्याची सुकलेली पाने असा अमलीपदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. गांज्याची अवैध लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी इंद्रदेव रामकिशोरदास भाजगोविंद याला अटक केली आहे.
याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट १९९८५ कलम २० (अ), ८ (अ), (ब), (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली.