महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पालकमंत्री गायब आहेत का?'; पालघरच्या पाहणी दौऱ्यानंतर डावखरेंचे मंत्री भुसेंवर टीकास्त्र - Palghar rain latest news

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. अशा संकटात पालघरचे पालकमंत्री आणि कृषिमंत्री दादा भुसे कुठे गायब आहेत, अशी टीका डावखरे यांनी केली. शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पालघर निरंजन डावखरे लेटेस्ट न्यूज
पालघर निरंजन डावखरे लेटेस्ट न्यूज

By

Published : Oct 22, 2020, 2:17 PM IST

पालघर - जिल्ह्यात आज आमदार निरंजन डावखरे यांनी परतीच्या पावसाने भातशेतीच्या केलेल्या नुकसान क्षेत्राची पाहणी केली. या वेळी, त्यांनी जिल्ह्यावर संकट आले असताना पालकमंत्री दादा भुसे दिसत नाहीत, तेगायब आहेत का? असे म्हणत भुसे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा -संवेदनाशून्य सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत समन्वय नाही - प्रवीण दरेकर

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गातेस, विक्रमगड मधील ओंदे, शीळ आणि पालघर तालुक्यातील चहाडे या ठिकाणी भेटी दिल्या. या वेळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या नुकसानाची पाहणी केली.

'पालकमंत्री गायब आहेत का?' डावखरेंचे मंत्री भुसेंवर टीकास्त्र

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. अशा संकटात पालघरचे पालकमंत्री आणि कृषिमंत्री दादा भुसे कुठे गायब आहेत, अशी टीका डावखरे यांनी केली. शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नुकसान झालेल्या भागात विक्रमगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सुनील भुसारा,पालघर विधान मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी या भागाला भेट दिली. शेतकऱ्यांचे इतके नुकसान झालेले असताना पालकमंत्री कुठे आहेत, असा सवाल आता भाजपकडून करण्यात येतोय.

हेही वाचा -आयएएस महिला अधिकाऱ्याने दिला आदिवासी महिलांना मदतीचा हात

ABOUT THE AUTHOR

...view details