महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shradda Murder Case : जबरदस्तीने नॉन व्हेज खाऊ घालण्यासाठी आफताब श्रद्धाला करायचा बेदम मारहाण! - श्रध्दा हत्या प्रकरण नवीन माहिती

( Shradda Murder Case ) आफताब हा श्रद्धाला जबरदस्तीने नॉन व्हेज खाऊ घालायचा. श्रध्दाने जर त्याला विरोध केला तर तो तिला बेदम मारहाण करायचा व घराबाहेर निघून जायचा. यानंतर आफताबचे आई-वडील श्रध्दाची समजूत घालायचे. पण नंतर देखील आफताब श्रध्दाला मारहाण करीत होता, अशी माहिती ठाणे जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात राहणाऱ्या समाजसेविका पूनम बिडलान ( Social Worker Poonam Bidlan ) यांनी दिली आहे.

Shradda Murder Case
श्रध्दा वालकर हत्या प्रकरण

By

Published : Nov 21, 2022, 6:00 PM IST

पालघर : श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात ( Shradda Murder Case ) दिल्ली पोलिसांचे पथक मुंबईत कसून चौकशी करत आहेत. दरम्यान श्रद्धा वाळकरचा मारेकरी असलेला आफताबविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आफताब श्रद्धाला करायचा मारहाण -आरोपी आफताब हा श्रद्धाला जबरदस्तीने नॉन व्हेज खाऊ घालायचा. श्रध्दाने जर त्याला विरोध केला तर तो तिला बेदम मारहाण करायचा व घराबाहेर निघून जायचा. यानंतर आफताबचे आई-वडील श्रध्दाची समजूत घालायचे. पण नंतर देखील आफताब श्रध्दाला मारहाण करीत होता, अशी माहिती ठाणे जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात राहणाऱ्या समाजसेविका पूनम बिडलान यांनी दिली आहे.

समाजसेविका पूनम बिडलान यांनी श्रध्दा हत्या प्रकरणाक माहिती दिली आहे.

तरी श्रध्दाची हत्या झाली नसती - नोव्हेंबर 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला केलेल्या मारहानीनंतर श्रद्धाचा रिक्षाचालक असलेला मित्र राहुल राय हा श्रद्धाला सामाजिक कार्यकर्त्या पूनम बीडलाल यांच्याकडे घेऊन आला होता. श्रद्धाला झालेल्या मारहाणीचा प्रकार श्रद्धा व तिच्या मित्राने पूनम बिडलाल यांना सांगितला होता. यावेळी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आफताबच्या आई-वडिलांनी श्रद्धाला विनवणी केल्यानंतर तिने गुन्हा दाखल करायचे टाळले होते, अशी माहिती पूनम बिडलाल यांनी दिली आहे. जर त्यावेळी श्रद्धाने आपली तक्रार मागे घेतली नसती तर कदाचित आज तिची हत्या झाली नसती, असे मत पूनम बिडलान यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details