पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी १०० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात २५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ११९ इतकी झाली असून, २८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पालघर ग्रामीणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आढळले १०० कोरोना रुग्ण
पालघर ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ११९ इतकी झाली असून, २८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या दिवशी १०० कोरोना रुग्ण आढळले असून या रुग्णांपैकी ३६ पालघर तालुक्यातील, ४० डहाणू तालुक्यातील, ८ जव्हार तालुक्यातील, ४ विक्रमगड तालुक्यातील, मोखाडा व वाडा तालुक्यांतील प्रत्येकी १ आणि १० वसई ग्रामीण भागातील आहेत.
तलासरी तालुक्यातील एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ११९ इतकी झाली असून, २८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५११ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.