महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये शनिवारी आढळले कोरोनाचे 269 रुग्ण; 521 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 613 आकडा पार केला आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 155 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

palghar corona update
वसई-विरारमध्ये शनिवारी आढळले कोरोनाचे 269 रुग्ण; 521 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

By

Published : Jul 12, 2020, 8:36 AM IST

वसई-विरार (पालघर) : संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 269 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात उपचारादरम्यान 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 521 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 613 आकडा पार केला आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 155 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 5 हजार 452 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 6 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थिती -

राज्यात शनिवारी 8 हजार 139 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 600 अशी झाली आहे. शनिवारी नवीन 4 हजार 360 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 36 हजार 985 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 99 हजार 202 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details