पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 49 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या 49 रुग्णांमध्ये 37 महिला व 12 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना बधितांची संख्या 381 झाली आहेत. आतापर्यंत 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 99 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालघर तालुक्यात 100, डहाणू 25, तलासरी 2, मोखाडा 2, वाडा 55, विक्रमगड 47, जव्हार 8, वसई ग्रामीण 35 अशा एकूण 274 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 24 तासात 49 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना बधितांची संख्या 381 झाली आहेत. आतापर्यंत 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण 99 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र, त्यांच्या वाढीच्या दरात काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. मृतांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचे आणि आधीपासून इतर काही आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशभरात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. मात्र, यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरांतून ग्रामीण भागांकडे लोक स्थलांतरित झाल्यामुळे तेथेही कोरोनाबाधित आढळून येत आहेत.