महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरचे नवे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी स्वीकारला पदभार - Namit Patil

पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून कैलास शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला.

पालघरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कैलास शिंदे

By

Published : Jul 18, 2019, 8:58 PM IST

पालघर- पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून कैलास शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. प्रशांत नारनवरे यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लागल्यामुळे त्यांच्या जागी शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. आज कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर


कैलास शिंदे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल यांच्या सचिवालय येथे उपसचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. २०१७ साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. पालघरला येण्यापूर्वी ते जिल्हा परिषद सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. स्वच्छ भारत मिशन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, टंचाई निवारण आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


पालघर जिल्ह्यातील ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून भारतीय प्रशासन सेवेच्या ३ अधिकाऱ्यांच्या तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी यांचीही बदली झाली आहे. पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारीपदी, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार अजित कुंभार यांची पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर पालघरच्या अनुसूचित जाती-जमाती जात पडताळणी समितीचे अध्यक्ष उ. अ.जाधव यांची जिल्हा परिषद पुण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्या जागी साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांची वर्णी लागली असून जिल्ह्यातच कार्यरत असलेले अजित कुंभार यांची पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिलिंद बोरीकर यांच्या जागी वर्णी लागली आहे. तर पालघर जिल्ह्याच्या अनुसूचित जाती जमाती पडताळणी समितीचे अध्यक्ष उ. जाधव यांचे पद अजूनही रिक्त आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details