महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंजेक्शन देऊनच ठार मारणार; शरद पवारांना फेसबुकवरून धमकी - नालासोपारा

शरद पवार यांना महेश खोपकर या व्यक्तीने फेसबुक अकाउंटवरुन पोस्ट टाकत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

तरुणाची फेसबुक पोस्ट

By

Published : Apr 19, 2019, 5:09 PM IST

पालघर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महेश खोपकर (रा. नालासोपारा) या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महेशने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकत ही धमकी दिली असून पवारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत.

महेशने १६ एप्रिलला दुपारी १२ वाजून ४ मिनिटांनी स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर शरद पवार यांना धमकी देणारी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘इंजेक्शन देऊनच ठार मारणार’, असे लिहिले आहे. यामुळे महेशला फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वसईच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details