पालघर - घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. घरोघरी घटस्थापना तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गामातेचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यानंतर रात्रीपासून जागोजागी गरबा आणि दांडियाची धूम सुरू झाली आहे.
नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष हेही वाचा - कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
पालघर जिल्ह्यातील केळवे येथील युवक मित्र मंडळाचे यंदाचे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने गावातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत देवीची भव्य मिरवणूक काढत आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या मातेच्या या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
हेही वाचा -शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; अंबाबाईची त्रिपुर सुंदरी महालक्ष्मी रुपात पूजा
तसेच परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांनी वाजत-गाजत मातेचे उत्साहात स्वागत केले. केळवे येथील युवक-मित्र मंडळातर्फे गेली 50 वर्षे अविरत सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने असल्याने येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.