पालघर- केळवे समुद्रकिनारी 2 वर्षांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो सुरुची झाडे पडली होती. त्यामुळे आता परत एकदा समुद्रकिनाऱ्यावरील 2 एकर परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करणयात येणार आहे. या ठिकाणी 2 हजार 500 सुरुची झाडे लावण्यात येणार आहेत.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पालघरमध्ये वृक्षलागवड, अडीच हजार सुरुची लावणार झाडे - वृक्षलागवड
समुद्रकिनाऱ्यावरील 2 एकर परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करणयात येणार आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पालघरमध्ये वृक्षलागवड
या आधी देखील पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी 3 हजार सुरुच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. तसेच पालघरमध्ये अनेक स्वच्छता मोहीमही धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानची सुरुवात 1943 मध्ये अध्यात्मिक कार्यापासून सुरू झाली. बालसंस्कार मार्गदर्शन व स्त्री-पुरुष अध्यात्मिक समाजप्रबोधन सोबत सामाजिक व पर्यावरण संतुलन जनजागृती या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते.