पालघर/वसई- वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओ संस्थेच्या नावाखाली ग्राहकांशी फोनवर संपर्क करून हा वेश्या व्यवसाय चालवला जात होता. या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी एका आरोपी महिलेस अटक केली आहे.
वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिलेस अटक - वेश्या व्यवसाय
वसईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी छापा मारून उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी एका महिलेस अटक केली आहे.
नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई-
वसईच्या कृष्णा टाऊनशीप या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री 9 वाजता एकास ग्राहक बनवून पाठवून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुप्त बातमीदारच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.